देहलीतील जंतर मंतर येथे हिंदूंच्या देवतांचा अवमान आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याचे प्रकरण
हिंदु जनजागृती समिती आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ते यांची मागणी

नवी देहली – येथील जंतर मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा देणे बंधनकारक असते.) परीक्षेच्या प्रश्नावर चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उघडपणे हिंदु धर्माचा अपमान आणि देशविरोधी चिथावणी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
No One Is Above the Law – Register Cases Against Kunal Kamra & Prakash Raj!@HinduJagrutiOrg and Supreme Court advocates have demanded criminal cases over insults to Hindu deities, hate speech, and anti-national remarks at the Jantar Mantar NEET protest by Cockroach Janata… pic.twitter.com/xG8ig1MMMj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 18, 2026
याविरोधात १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने नवी देहलीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार प्रविष्ट केली असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

A joint delegation of Supreme Court advocates and Hindu Janajagruti Samiti has approached the Parliament Street Police Station in New Delhi, demanding the registration of an FIR over speeches and activities at the Jantar Mantar protest held under the banner of the "Cockroach… pic.twitter.com/ZSyDcbh7h4
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) July 18, 2026
संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून हे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता मकरंद अडकर, अधिवक्त्या अमिता सचदेवा, अधिवक्ता अतुल शर्मा, अधिवक्ता मयंक द्विवेदी, अधिवक्ता केशरी सत्या, अधिवक्ता हर्ष वर्धन, अधिवक्ता सौरभ मिश्रा यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे देहली राज्य समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे आणि श्री. श्रीराम लुकतुके यांचा समावेश होता.
Today, 18 July 2026, we submitted a detailed complaint to the ACP, Parliament Street Police Station, seeking the registration of an FIR under the relevant provisions of the Bharatiya Nyaya Sanhita, 2023.
The complaint raises serious concerns regarding the hate speech and… pic.twitter.com/QemyOoXHrP
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) July 18, 2026
तक्रारीत म्हटले आहे की,
१. ‘स्टँड-अप कॉमेडियन’ (प्रेक्षकांसमोर एकट्याने सादरीकरण करणारा विनोदी कलाकार) कुणाल कामरा याने मंचावरून ‘हे सरकार अनेक वर्षांपासून सीताच्या पतीचे (रामाचे) नाव घेऊन नीताच्या पतीचे (मुकेश अंबानी यांचे) काम करत आहे,’ असे अत्यंत अपमानास्पद विधान करून १०० कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. आंदोलनाच्या मंचावरून एका महिलेने ‘सब बुत उठवाए जाएंगे… बस नाम रहेगा अल्ला का’ (सर्व मूर्ती हटवल्या जातील आणि केवळ अल्लाचे नाव राहील), हे पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांचे चिथावणीखोर गाणे गायले. हे थेट मूर्तीपूजक हिंदु धर्मावरील आक्रमण आहे. या मंचावर ‘सिमी’ या भारत सरकारने बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनेशी संबंधित असलेले तथा देहली दंगलीतील आरोपी उमर खालिद याचे वडील सय्यद कासिम रसूल इलियास हेही उपस्थित होते. तसेच अभिनेते प्रकाश राज यांनी मंचावरून ‘आम्हाला आतंकवादी किंवा पाकिस्तानी म्हटले तरी पर्वा नाही,’ असे म्हणत तरुणांना व्यवस्थेविरुद्ध विद्रोह आणि बंड करण्यासाठी चिथावले.
२. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून देशविरोधी आणि साम्यवादी विचारांच्या लोकांची एक राजकीय कार्यसूची (अजेंडा) आहे, हे यावरून स्पष्ट होते.
| हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –
|
हे ही वाचा → FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
३. या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण भाषण) प्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा (शाहीन अब्दुल्ला विरुद्ध भारत संघ) संदर्भ देण्यात आला असून त्यानुसार पोलिसांनी स्वतःहून तत्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे), १९६ (शत्रुत्व पसरवणे), १५२ (देशाच्या अखंडतेला धोका) आणि ३५३ (चिथावणीखोर विधाने) अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. यासह या आंदोलनाच्या अर्थपुरवठ्याची आणि ‘सिमी’शी संबंधित लोकांच्या सहभागाची ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यां’तर्गत सखोल चौकशी करण्याची मागणीही केंद्रीय गृहमंत्री आणि देहली पोलीस आयुक्त यांच्याकडे या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण