
कोल्हापूर – केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या विकास कामांची पहाणी केली. श्रीपाद नाईक यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शनही घेतले. या वेळी श्रीपाद नाईक यांनी मनकर्णिका कुंडाची पहाणी करून चालू असलेल्या कामाच्या संदर्भात काही सूचना आणि मार्गदर्शन केले. या कामाच्या संदर्भात ऊर्जा विभागाच्या वतीने काही साहाय्य लागले, तर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव सौ. वर्षा साळुंखे, धर्मशास्त्र मार्गदर्शक श्री. गणेश नेर्लेकर, मराठा तितुका मेळवावाचे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, श्री. युवराज शिंदे, तसेच इतर कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
राज्यातील प्रत्येक महाविद्यालयाने प्रवेश शुल्काचे फलक दर्शनी भागात लावावेत !