रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती
‘ध्यानमंदिरात गेल्यावर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांकडे पाहिल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला जाणवले.