श्री अनंत देवस्थानातील शेषासन
आपल्या मनातील कल्पना साकार होण्यास आपल्यामध्ये तसे सामर्थ्य असावे लागते किंबहुना त्या वाहनात स्थानापन्न होण्याची श्रींची इच्छा ही तर सर्वांत अधिक महत्त्वपूर्ण असते. या सर्व गोष्टींचा ज्या वेळी संगम होतो, तेव्हाच अशा कल्पना मूर्तीमंत स्वरूपात (प्रत्यक्षात) उतरतात, याचा प्रत्यक्षात अनुभव आम्हाला आला.