अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !
डॉ. सुजीत कोशिरे, पंचवटी, नाशिक
१. ‘ध्यानमंदिरात गेल्यावर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांकडे पाहिल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला जाणवले.
२. श्री गणेश आणि श्री भवानीदेवी यांच्या मूर्तींकडे बघून मला पुष्कळ आनंद जाणवत होता.
३. ‘नामजपाचे महत्त्व’ या सत्राच्या वेळी श्री. नागेश गाडे यांनी नामजपाचे महत्त्व सांगितल्यावर माझा नामजप आपोआप चालू झाला.
४. मी भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी गेलो. तेथे पाणी देणार्या एका ताईंना (साधिकेला) बघून ‘साक्षात् अन्नपूर्णादेवीच मला पाणी देत आहे’, असे मला वाटले.
५. साधनेचे गांभीर्य लक्षात येणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र यांवर झालेले अनिष्ट शक्तीचे आक्रमण पाहून मला पुष्कळ वाईट वाटले अन् साधनेचे गांभीर्य माझ्या लक्षात आले.’ (७.३.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |