विष्णुपूजनाच्या वेळी सनातनच्या रामनाथी आश्रमात साधिकेने अनुभवलेले भाव क्षण

विष्णुपूजनाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या ठिकाणी बसून स्वतः श्री विष्णूची पूजा करत आहे’, असा भाव ठेवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘२१.९.२०१९ या दिवशी आश्रमात विष्णुपूजन होते. त्या दिवशी पूजेच्या वेळी मी उपायांना येऊन बसले. तिथे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी पूजेला आरंभ केल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई पूजा करत असतांना ‘मी त्यांच्या ठिकाणी बसून श्री विष्णूची पूजा करत आहे’, असा भाव ठेवला होता. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई श्रीविष्णूच्या चरणी तुळशीपत्र वहात असतांना मी मानसरित्या तुळशीपत्र वहात होते. मी जेथे तुळशीपत्र वहात असे, त्याच ठिकाणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई तुळशीपत्र ठेवायच्या. १०८ तुळशीपत्रे वहातांना मला असेच अनुभवायला मिळाले. श्रीविष्णु ज्या समुद्रात शेषशय्येवर होता, तो समुद्रही पूजेच्या वेळी शांत होता. पूजेनंतर आरती म्हणतांना माझ्याकडून ‘त्या आरतीतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांंना आळवत आहे’, असा भाव ठेवला गेला. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते आणि मन पूर्ण एकाग्र झाले होते.’

– कु. सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१०.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक