१. यज्ञकुंडातून असंख्य दैवी कण प्रक्षेपित होत असल्याचे दिसून ‘यज्ञकुंड आणि सर्व साधक एका सुवर्णलोकात आहेत’, असे दिसणे
‘रामनाथी आश्रमात ‘नारायण होम’ झाला. होमाच्या तिसर्या दिवशी यागाच्या वेळी मला यज्ञकुंडातून असंख्य सोनेरी दैवी कण येतांना दिसू लागले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्याभोवती असंख्य सोनेरी दैवी कण प्रक्षेपित होतांना दिसले. ‘यज्ञकुंड आणि सर्व साधक एका सुवर्णलोकात आहेत अन् सर्वत्र पुष्कळ तेज पसरले आहे’, असे मला दिसले.
२. पूर्णाहूतीच्या वेळी ‘ॐ’ चा उच्चार ऐकू येऊन चैतन्य आणि विष्णुतत्त्व मिळत असल्याचे जाणवणे
नारायण होमाच्या पूर्णाहूतीच्या वेळी ‘श्री विष्णुसहस्र नामातील मंत्रोच्चार हे वेगवेगळे शब्द नसून ‘ॐ’ आहे आणि तो उच्चार माझ्या कानावर पडून मला चैतन्य अन् विष्णुतत्त्व मिळत आहे’, असे मला जाणवले.
गुरुदेवांच्या कृपेमुळे यज्ञातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण करता आले आणि या अनुभूती आल्या. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला अमित औंधकर (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |