परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हसतमुख, आनंदी आणि इतरांना समजून घेणारे चि. प्रशांत सोन्सुरकर अन् प्रेमभाव आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेली चि.सौ.कां. अनिता सुतार !

१७.११.२०२० या दिवशी शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. प्रशांत प्रभाकर सोन्सुरकर आणि म्हापसा (गोवा) येथील चि.सौ.कां. अनिता नारायण सुतार यांचा शुभविवाह आहे.

श्री गुरुचरणी आता एकच मागणे आहे ।

आज मी गुरुब्रह्म पाहिले । आम्हा अजाण लेकरांना ज्ञानामृत पाजण्या ।
भूवरी अवतरले ‘जयंत’ नामे विष्णुरूपी गुरुब्रह्म

५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा वडोदरा (गुजरात) येथील चि. अद्वैत रवींद्र पोत्रेकर (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अद्वैत पोत्रेकर हा एक आहे !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वडोदरा (गुजरात) येथील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर हा एक आहे !

तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे अन् साधकांचा आधारस्तंभ असलेले डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवलीतील सनातन संस्थेचे साधक श्री. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. १७.११.२०२० या दिवशी त्यांचा निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

नरकचतुर्दशीच्या दिवशी करतो श्रीकृष्णाचा विजयोत्सव साजरा ।

नरकचतुर्दशीच्या दिनी श्रीकृष्णाने मुक्त केल्या ।
१६ सहस्र उपवर कन्या नरकासुराच्या गुलामीतून ।
श्री गुरुच करतील मुक्त मला मनाच्या गुलामीतून ॥

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे झालेले लाभ’ याविषयी देवद आश्रमातील श्री. अरुण डोंगरे यांची झालेली विचारप्रक्रिया !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यास होणार असलेले अपेक्षित लाभ आणि संभाव्य हानी अन् सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना केल्यामुळे झालेले लाभ’ यांविषयी देवद आश्रमातील श्री. अरुण डोंगरे यांची झालेली विचारप्रक्रिया !

हिंदूंनो, जीवनाचे अध्यात्मीकरण करण्यासाठी हे टाळा आणि हे करा !

‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे, म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय. हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचार हा सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारा आहे.

धर्माचरणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक विचार

‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’