१. श्री. जी. राधाकृष्णन्, राज्य अध्यक्ष, शिवसेना, चेन्नई, तमिळनाडू.
अ. ‘रामनाथी आश्रम पुष्कळ चैतन्यमय असून बाहेरील वातावरणापेक्षा येथे सर्वाधिक आध्यात्मिक शक्ती जाणवते. येथील गोष्टींचे पालन केले, तर बाहेरील वातावरणातसुद्धा असे चांगले पालट होऊ शकतील.
आ. येथे सकारात्मक स्पंदने असल्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी पुष्कळ बळ मिळते.’ (७.६.२०१८)
२. श्री. नवीन चंदर, मलकाजगिरी, तेलंगाणा.
अ. ‘रामनाथी आश्रमात मला शांती आणि प्रसन्नता जाणवली. येथे अनेक वस्तूंमधील तेजतत्त्व आणि वायुतत्त्व वाढल्याचे मला पहायला मिळाले. मी जर येथे आलो नसतो, तर मला या गोष्टींचे ज्ञान कधीच मिळाले नसते.
आ. रामनाथी आश्रम परिपूर्ण असून त्याला कुठलीही चाचणी न करता ISO कडून प्रशस्तीपत्रक दिले गेले पाहिजे. हा आश्रम म्हणजे एका उत्तम व्यवस्थापनाचा नमुना ठरू शकेल.’ (१०.६.२०१८)
३. श्री. सर्वेश रामनाथकर, कार्यकर्ता, श्रीराम सेना, बेळगाव, कर्नाटक.
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मी अवाक् झालो; कारण ‘पृथ्वीवर स्वर्ग आहे’, असे म्हटले जाते. ते ठिकाण दुसरे कुठे नसून रामनाथी आश्रम हेच ते एकमेव ठिकाण आहे.’
सूक्ष्म जगताविषयीच्या प्रदर्शनाविषयी अभिप्राय : ‘जगात जशा चांगल्या शक्ती असतात, तशाच अनिष्ट शक्तीही असतात. या प्रदर्शनात मी त्याचा अनुभव घेतला.’ (१०.६.२०१८)
|