सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु गाडगीळकाका यांच्या सेवेत असणारे श्री. भूषण कुलकर्णी हे गावी जाणार असल्याने मला नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ या काळातील काही दिवस सद्गुरु गाडगीळकाका यांच्या खोलीत स्वच्छता करायची सेवा मिळाली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधिकेच्या मणक्याचे शस्त्रकर्म होऊनही तिची कंबर आणि पाय यांत वेदना होणे अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तिची प्रकृती सुधारणे

‘१०.१२.२०१९ या दिवशी माझ्या मणक्याचे शस्त्रकर्म झाले, तरीही माझे कंबर आणि पाय सतत दुखत होते…

साधिकेने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता !

‘सद्गुरु गाडगीळकाकांनी शोधलेले नामजप प्रभावी आहेत’, हे मला ठाऊक होते. त्यांनी सांगितलेल्या नामजपाची परिणामकारकता मला प्रत्यक्ष अनुभवायला आली.

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना त्यांचे वडील पू. सत्यनारायण तिवारी यांची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

माझ्या मनात प्रार्थना आणि सेवा यांचे विचार असतील किंवा मी नामजप करत असेन, तेव्हा पू. बाबा माझ्याकडे अधूनमधून शांतपणे पहायचे. त्या वेळी ‘संतांच्या सहवासात आपले सतत परीक्षण होत असते’, असे मला वाटले. 

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि आजाराचे अचूक निदान करून त्यावर नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) यांना खोकल्याचा तीव्र त्रास होत होता. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी पू. दातेआजींना लाभ होऊन त्यांचा खोकला न्यून झाला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे औषधोपचारांचा लाभ होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्याची साधिकेच्या नातेवाइकाला आलेली अनुभूती !

‘आजारपणात रुग्णाने आणि त्याच्या नातेवाइकांनी नामजपादी उपाय केल्यास त्यांना कसा लाभ होतो ?’, याविषयीच्या अनुभूतींचा काही भाग २४.४.२०२४ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे औषधोपचारांचा लाभ होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्याची साधिकेच्या नातेवाइकाला आलेली अनुभूती !

सद्गुरु काकांनी ‘तिच्या शरिरात ३ मोठ्या गाठी असून दोन गाठी छातीत आणि एक गाठ हिरडीच्या ठिकाणी आहे’, असे मला सांगितले. तिच्या वैद्यकीय अहवालातही तसेच आले.

प्राचीन भारतीय मंदिरे : मानवी जीवनाचा केंद्रबिंदू !

कित्येक सहस्र वर्षे हिंदु संस्कृतीचे जतन करण्यात मोलाचा वाटा उचलणार्‍या, तसेच विज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक स्वास्थ्य जोपासणार्‍या देवालयांच्या वास्तूशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचे सामाजिक जीवनात अवतरण करणे, हेच आजच्या युगातील शास्त्रज्ञांना आव्हान आहे !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांना झालेले लाभ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.

सर्वसामान्यपणे सूर्याचा जप करायचा झाल्यास ‘श्री सूर्याय नमः ।’ हा प्रचलित नामजप करावा !

एखादे विशिष्ट कार्य सिद्धीस जाण्यासाठी त्या विशिष्ट देवतेची शक्ती हवी असल्यास, त्या देवतेच्या त्या विशिष्ट रूपाची उपासना आणि त्या देवतेच्या त्या रूपाचा नामजपही करावा लागतो.