चीनच्या विनंतीवरून रशियाने पाकिस्तानला पुरवले कच्चे तेल !

भारतासाठी हा मोठा धक्का !

इस्लामाबाद – रशियाकडून ४५ सहस्र मॅट्रिक टन स्वस्त कच्चे तेल पाकिस्तानला पाठवले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये चालू असलेली महागाई आणि तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमती या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानसाठी हे आश्‍वासक वृत्त असल्याचे सांगितले जात आहे.

भारतासाठी हा मोठा धक्का आहे; कारण रशिया आणि भारत यांचे संबंध दृढ राहिले आहेत. चीनच्या विनंतीवरून रशियाने पाकिस्तानला कच्चे तेल पाठवले आहे. (भारताची कुरापत काढण्याची चीन एकही संधी सोडत नाही, हे यातून दिसून येते ! – संपादक) ‘भारताच्या हिताला आव्हान देणारी ही घटना आहे’, असे बोलले जात आहे.

 (सौजन्य : Bharat Tak)

संपादकीय भूमिका

रशिया आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे बोलले जाते; मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो, तर प्रत्येक जण स्वहित पहात असतात, हे या घटनेतून लक्षात येते. हे लक्षात घेऊन भारताने सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आवश्यक !