चीनचा पुढकार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानशी व्यापार वाढवण्याची आमची इच्छा आहे, असे वक्तव्य रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी येथे केले. चीनच्या सांगण्यावरून १२ जून या दिवशी रशियाच्या कच्च्या तेलाची पहिली खेप पाकिस्तानच्या कराची बंदरावर पोचली. त्या पार्श्वभूमीवर सर्गेई यांनी वरील वक्तव्य केले. आजपर्यंत पाकिस्तान आणि रशिया यांच्यात विशेष सलोख्याचे संबंध नव्हते. अशात चीनच्या सांगण्यावरून रशियाने घेतलेली ही भूमिका भारतविरोधी असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांनी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार असल्याने रशियाने भारताला डिवचण्यासाठी ही भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे.
#Russia is keen to expand and deepen bilateral ties with #Pakistan as the first shipment carrying discounted Russian oil reached Karachi Port at the weekend, Russian Foreign Minister Sergei Lavrov said. https://t.co/lvhQe7uD8w
— The Hindu (@the_hindu) June 13, 2023
१. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले. त्याचा परिणाम रशियाच्या कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर झाला. अनेक युरोपीय देशांनी रशियाकडून कच्चे तेल घेणे बंद केले. त्यामुळे रशियाने तेलाचे मूल्य अल्प केले. याचा लाभ उठवत भारताने रशियाकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे अनेक पाश्चात्त्य देशांनी भारतावर दबाव आणण्यासह रशियापासून दूर रहाण्याविषयी भारताला धमकावले.
२. आता रशियाने पाकिस्तानसमवेत व्यापार वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हा भारताला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.
संपादकीय भूमिका
|