युक्रेनने भारतासह ९ देशांतील राजदूतांना परत बोलावले !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारतासह ९ देशांतील त्यांच्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारतासह ९ देशांतील त्यांच्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी थेट रणांगणात उतरा, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना आव्हान दिले. मागील ४ मासांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे.
युक्रेनने त्याची राजधानी कीव्ह कह्यात घेण्याची रशियन योजना उधळून लावली असली, तरी दीर्घ युद्धाचा विचार केला, तर रशिया जिंकत असल्याचे सांगितले जात आहे. रशियाने स्वेरडोनेत्स्क शहर कह्यात घेतले असून लवकरच तो लुहान्स्क प्रांताचा ताबा घेऊ शकतो.
रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात चर्चा आणि कूटनीती यांच्या माध्यमातून उपाय काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
युक्रेन-रशिया युद्ध चालू असतांनाच ‘नाटो’ ने फिनलंड आणि स्वीडन यांना ‘नॉर्थ अॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘नाटो’ संघटनेचे सदस्य बनण्याचे निमंत्रण दिले आहे.
या निर्णयामुळे लुहांस्क प्रांतातील मोठा भाग रशियाच्या कह्यात जाणार आहे. लुहांस्क प्रांतात रशियन भाषा बोलणार्यांची संख्या लक्षणीय असल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची या प्रांतावर आधीपासून दृष्टी होती.
गेल्या साडेतीन मासांपासून चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आतापर्यंत रशियाचे अनुमाने ३४ सहस्र १०० सैनिक ठार झाले, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला.
पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते.
‘अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या लाभाचा आणि हानीचा विचार करावा’, असा सल्लाही पुतिन यांनी दिला आहे.
युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी एकत्र येऊन रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. असा निर्णय घेऊन त्या देशांना रशियाने रोखठोक प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.