अमेरिका तिच्या मित्रपक्षांना गुलामासारखे वागवते ! – रशियाचे राष्ट्रपती पुतिन

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – अमेरिका आता पूर्वीसारखी शक्तीशाली राहिलेली नाही. दुःखाची गोष्ट ही आहे की, ती तिच्या मित्रपक्षांनाही गुलामांप्रमाणे वागवते. आता जगात अमेरिकेचे वर्चस्व संपले आहे, हे तिच्या मित्रपक्षांनीही समजून घेतले पाहिजे. ते व्हायलाच हवे होते; कारण जो दुसर्‍यांना नेहमी दुबळे आणि गुलाम समजतो, त्याला एक दिवस त्याची किंमत चुकवावी लागते, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेवर टीका केली. ‘अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या लाभाचा आणि हानीचा विचार करावा’, असा सल्लाही पुतिन यांनी दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर रशिया आणि युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दुसर्‍यांदा कीव येथे पोचले. जॉन्सन यांनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली.