रशिया-युक्रेन युद्धात रशियाचे ३४ सहस्र सैनिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा

कीव (युक्रेन) – गेल्या साडेतीन मासांपासून चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आतापर्यंत रशियाचे अनुमाने ३४ सहस्र १०० सैनिक ठार झाले, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला.

युक्रेनच्या वायूदलानेही २१ जून या दिवशी एक रशियन क्षेपणास्त्र, २ ड्रोन आणि २ दारूगोळा डेपो नष्ट केल्याचा दावा केला आहे.