युद्धामध्ये आतापर्यंत युक्रेनच्या १० सहस्र सैनिकांचा मृत्यू

अमेरिका आणि इतर काही पाश्‍चात्त्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने १० सहस्र सैनिक गमावले आहेत, तर युक्रेनकडून मात्र १० जूनपर्यंत रशियाचे अनुमाने ३१ सहस्र ९०० सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे.

युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यास गेलेल्या २ ब्रिटिश आणि  मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशियाकडून मृत्यूदंडाची शिक्षा

रशियाच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या २ ब्रिटिश आणि मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशिया समर्थनक डोनबास भागात अटक करण्यात आली होती.

पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे ! – युक्रेन

युद्ध संपल्यानंतर देशाच्या पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे, अशी अपेक्षा युक्रेनकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आम्ही नव्या ठिकाणांना लक्ष्य करू ! – रशियाची युक्रेनला चेतावणी

युक्रेनला लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात आला, तर आम्ही काय निष्कर्ष काढायचा तो काढू, तसेच यापूर्वी कधीही आक्रमण न केलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करू.

‘स्वतःचे प्रश्‍न हे सर्व जगाचे प्रश्‍न आहेत’, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी !  

चीनशी भारताचे संबंध चांगले नसले, तरी भारत त्याचा सामना करण्यास सक्षम असल्याचाही स्पष्टोक्ती

रशियाने आतापर्यंत युक्रेनचे २४ सहस्र किलोमीटर रस्ते आणि ३०० पूल उद्धवस्त केले

‘कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या विश्‍लेषण विभागाच्या अहवालानुसार, या युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेची आतापर्यंत ८ बिलियन डॉलर्सहून अधिक (अनुमाने ६२ सहस्र १५५ कोटी रुपयांहून अधिक) हानी झाली आहे.

आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांनी घेतली रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट !

रशिया-युक्रेन युद्धामुळे आफ्रिकेतील खाद्य संकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आफ्रिकेला रशियाकडून मोठ्या आशा आहेत, असे वक्तव्य आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष तथा सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी सॉल यांनी केले.

भारताप्रमाणे पाकला स्वस्तात इंधन तेल देण्यास रशिया निरुत्साही !

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल म्हणाले की, जर अमेरिकेच्या निर्बंधांची भीती नसेल, तर आम्ही रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करू. रशियाने भारताप्रमाणे पाकला स्वस्तात तेल देण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

युरोपीयन युनियन रशियाकडून तेल आयातीत दोन तृतीयांश कपात करणार !

युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न

युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी पोलंडला जागतिक निधीचे केंद्र बनण्याची इच्छा !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मोडकळीस आलेल्या युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी पोलंड जागतिक निधीचे केंद्र बनावे, असे वक्तव्य पोलंडचे उपपंतप्रधान जेसेक सॅसिन यांनी केले. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून पलायन केलेल्या शरणार्थींपैकी तब्बल ३७ लाख शरणार्थींना एकट्या पोलंडने आश्रय दिला आहे.