गुंड गजा मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर पोलिसांची धाड
कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.
श्रीरामाने निर्माण केल्याचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेला वाळुकेश्वर येथील बाणगंगा कुंड विकासक इमारतीसाठी करत असलेल्या खोदकामामुळे बाधित झाले आहे.
मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात चित्रपट चालू असतांना काही प्रेक्षकांनी फटाके फोडले. फटाके फोडणार्या अज्ञात प्रेक्षकांविरोधात चित्रपटगृहाच्या मालकाने पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी भाजपकडून ‘व्हिप’ काढण्यात आला होता.
सुंद्रीकला अकादमीच्या वतीने येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम्, मोहिनी अट्टम आदी विविध संगीतांच्या कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम साधत मिरजेत कृष्णामाई उत्सव साजरा करण्यात आला. मिरजेतील ऐतिहासिक कृष्णा घाट येथे मार्कंडेय मंदिराच्या घाटावर या उत्सवात प्रथम २० फेब्रुवारी या दिवशी घाट, नदी पात्राची वाट यांची स्वच्छता करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील अडचणींना सामोरे जातांना कधीही डगमगले नाहीत. आई तुळजाभवानीचा नामजप, सतत युद्धाभ्यास आणि वेळप्रसंगी युक्तीने गनिमी कावा यांचा उपयोग करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाविषयी नागरिकांना दिलासा द्यायचे सोडून राज्य सरकार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रंगराव बाबू जोंग (रहाणार राशिवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या वयोवृद्ध मेंढपाळाने एका शेतात मेंढ्यांचा कळप उतरवला होता.