जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत दुरुस्त करीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही ! – सौ. स्नेहा गवस, सरपंच, झरेबांबर
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही डागडुजी का करत नाही ? जे पालकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही डागडुजी का करत नाही ? जे पालकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का ?
सनातनच्या साधिका सौ. मेधा गोखले यांच्या आई सौ. कुंदा गोपाळ भिडे (वय ७५ वर्षे ) यांचे ८ जानेवारी या दिवशी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पच्छात पती, २ मुली, ३ जावई आणि ४ नातवंडे असा परिवार आहे.
लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील सनातनच्या साधिका सौ. शशिकला शामराव टेमकर यांचे वडील कै. गुलाबराव भिकाजी शेवाळे (वय ९३ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता निधन झाले.
असळज (तालुका गगनबावडा) येथे डॉ. डी. वाय. पाटील ऊस कारखाना निर्मितीनंतर जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी या दोन तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख टन उसाचे उत्पादन होते. यंदा कोरोनामुळे बीड, परभणी यांसह विविध भागांतून ऊसतोडणीसाठी येणारे कामगार अल्प आले आहेत.
३ शहरांच्या तुलनेत पुणे शहराची हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निरीक्षण
आस्थापनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
श्री. बावडेकर पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेजवळील भूखंडावरील आरक्षण उठवण्यास भाजपचा विरोधच आहे. महासभेसमोर हा विषय आल्यास यावर सखोल चर्चा होऊन तो फेटाळण्यात येईल.
पिळये, धारबांदोडा येथील एक अल्पवयीन मुलगी गायब झाल्यासंबंधीची तक्रार ७ जानेवारी या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आरोपी आणि गायब झालेली मुलगी यांचा पोलीस शोध घेत असून अजून त्याविषयी काही माहिती मिळालेली नाही.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार उणावला असला, तरी कोरोनाविषयीची भीती अल्प होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे.
वर्ष २०२०-२१ च्या धान्य खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची (पोत्यांची) आवश्यकता आहे. शासनाने ही बारदाने पुरवावीत, अशी मागणी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.