नरवणे (जिल्हा सातारा) येथे वाळू उपशाच्या वादातून २ चुलत भावांचा मृत्यू !
वाळू उपशाच्या कारणावरून माण तालुक्यातील नरवणे गावातील २ चुलत भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये २ चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.
वाळू उपशाच्या कारणावरून माण तालुक्यातील नरवणे गावातील २ चुलत भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये २ चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.
हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्गातील पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
पांडे-खानापूर सीमेलगत दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची शेतभूमी आहे. त्यांच्या शेजारी संतोष घाटे यांची शेतभूमी आहे. घाटे यांनी शेतात १० ते १२ ट्रॅक्टर मळी टाकली आहे.
पुणे येथील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता भीषण आग लागली होती. त्यानंतर १ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.
१० सहस्र रुपयांंपुढे हळदीची बोली काढावी, तसेच लवकरात लवकर हळदीचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी बांधवांनी वाई बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांच्याकडे केली. या वेळी ‘तातडीने व्यापार्यांची बैठक घेऊन हळदीचे लिलाव घेऊ’, असे आश्वासन पिसाळ यांनी शेतकर्यांना दिले.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या फलकाखालीच कचर्याचा ढीग लावण्यात आला आहे.
अनधिकृतपणे खासगी सावकारी करणारे विजय उपाख्य विराट विलास चव्हाण यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले.
निर्जनस्थळी मानवी कवटी, अस्थी आणि इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या काचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी फोडल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.
वडील, पत्नी आणि आई या तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.