माहीम दर्ग्याचे विश्‍वस्त डॉ. मुदस्सिर लांबे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार

माहीम दर्ग्याचे विश्‍वस्त आणि वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सिर निसार लांबे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून त्यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त, महिला आयोग आणि गृहमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

बलात्काराचा गुन्हा नोंद असलेले निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना अटक

स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी साहाय्य करीन, असे सांगत बंगल्यावर नेऊन वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी कडेगाव पोलीस पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यावर २८ ऑगस्ट २०२० या दिवशी बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता.

विवाहाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नाही ! – देहली उच्च न्यायालय

जर महिला दीर्घ काळापासून संबंधित व्यक्तीसमवेत सतत शारीरिक संबंध ठेवत असेल, तर विवाहाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच, असे नाही, असा निर्णय देत देहली उच्च न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळली.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप !  

पूज्यापाद संतश्री आसाराम बापू यांच्यावरही राजस्थानमधील कथित प्रकरणावरून देहली पोलिसांत तक्रार करून कारवाई करण्यात आली होती. त्यांना एक न्याय, तर हेमंत सोरेन यांना वेगळा न्याय का ?

पाकिस्तानात बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याचा कायदा लागू !

• विशेष न्यायालये स्थापन करून ४ मासांतच निकाल लावणार • योग्य प्रकारे अन्वेषण न करणारे पोलीस आणि सरकारी अधिकारी यांना दंड होणार : पाकिस्तान असा कायदा बनवू शकतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पुढारलेला असलेला भारत का बनवू शकत नाही ?

चर्चच्या वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेमध्ये बलात्काराचा आरोप असणारे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांचे छायाचित्र !

हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्‍या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?

बहुतांश तरुणी स्वतःहून संबंध ठेवतात अन् प्रेमभंग झाल्यावर बलात्काराची तक्रार करतात ! – छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक

समाजातील नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! समाजाला आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !

कायदे अनेक, उपाय एक !

कायद्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी ती राबवणारी प्रामाणिक आणि सक्षम व्यवस्था प्रथम अस्तित्वात आणणे आवश्यक आहे.

बेंगळुरू येथे युवतीचे लैंगिक शोषण करून तिच्या धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणार्‍या धर्मांधाला अटक

लग्नाचेे अमीष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण केल्यावर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव निर्माण करणार्‍या २५ वर्षीय शबाब याला येथील जयनगर पोलिसांनी अटक केली.

चित्रपटातील ‘आयटम डान्स’, अश्‍लील चित्रपटे बलात्काराची मानसिकता निर्माण करतात ! – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना घडतात. यांसह समाजामध्ये नैतिकता निर्माण करण्यासाठी त्याला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. साधना शिकवली असती, तर असे घडले नसते !