खंडवा (मध्यप्रदेश) येथील मदरशातील मौलानाकडून ६ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

खंडवा (मध्यप्रदेश) – येथील मदरशामध्ये एका ६ वर्षीय मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मौलाना अब्दुल समद याला अटक करण्यात आली आहे.

स्थनिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, येथील खानशाहवली भागात असलेल्या जकरिया मशिदीत मौलानाने हे कृत्य केले. मौलानाच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

बदायूं (उत्तरप्रदेश) येथील मदरशातील व्यवस्थापकासह तिघांकडून शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार

बदायूं (उत्तरप्रदेश) – येथील एका मदरशातील शिक्षिकेवर मदरशाचा व्यवस्थापक राशिद अली याच्यासह नजरुल हसन आणि मुजाहिद उपाख्य गुड्डू यांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना एप्रिल २०२० मधील आहे. पीडित शिक्षिकेने अडीच वर्षांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केल्याने पोलिसांनी आधी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु याविषयी तिने न्यायालयात दाद मागितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणी तिने कुणाला माहिती दिल्यास तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्यात येईल, असे तिला धमकावण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

मदरशांमध्ये देशविघातक कृत्ये होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. बलात्कार, लैंगिक शोषण आदी गुन्ह्यांच्या बातम्याही येत असतात. त्यामुळे अशा सर्वच मदरशांना केंद्र सरकारने आता टाळे ठोकले पाहिजे !