शेख जाहिद याने पंडित असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात  

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात

विवाहाचे आमीष दाखवून केला बलात्कार !

 

भोपाळ – मध्यप्रदेशच्या शाजापूरमध्ये एक हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली आहे. शेख जाहिद नावाच्या मुसलमान व्यक्तीने पंडित असल्याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आरोपी जाहिद याने हिंदु तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर जाहिदने तिच्यावर मुसलमान होण्यासाठी दबाव आणण्यास चालू केले, असे पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी जाहिदला अटक केली आहे, तर याच प्रकरणात हवा असलेला जाहिदचा भाऊ साजिद याचा पोलीस शोध घेत आहेत. पीडित हिंदु तरुणीच्या प्रकरणाविषयी समजताच हिंदु संघटना सक्रीय झाल्या. सर्वांनी तरुणीसह शुजालपूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी जाहिद उर्फ गामा याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पीडित हिंदु तरुणीने तिच्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, स्वत:ला ब्राह्मण असल्याचे सांगून जाहिदने तिच्याशी जवळीक साधली आणि तिला विश्‍वासात घेऊन विवाहाचे वचन दिले. पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिने जाहिदवर विवाहासाठी दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात विवाह केला. तेथे त्याची कागदपत्रे पाहिल्यानंतर पीडितेला तो मुसलमान असल्याची माहिती मिळाली. पुढे तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर जाहिदने तिला त्रास देणे चालू केले. जाहिदने तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. आरोपी तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असे. पीडितेच्या छेडछाडीत आरोपीचा भाऊ साजिद आरोपीला साथ द्यायचा. पीडित तरुणी ब्राह्मण असल्याने ते तिला मांस खाण्यास भाग पाडत. तिने नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण करायचे, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.