गाझियाबाद येथील विवाहितेवरील सामूहिक बलात्काराची घटना खोटी !

संपत्तीच्या वादातून रचला बनाव !

आयजी प्रवीण कुमार यांनी घेतलेली पत्रकार परिषद

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे २ दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेवर काही जणांनी अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची आणि नंतर तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना समोर आली होती; मात्र पोलिसांच्या चौकशी अशी घटना प्रत्यक्षात घडलीच नसून केवळ तसा बनाव रचण्यात आला होता, असे उघड झाला आहे. या प्रकरणी या महिलेच्या मित्रासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

सौजन्य : vikhyat khabrein

मेरठचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, महिलेवर सामूहिक बलात्कार झालेला नाही. महिलेने ५३ लाख रुपयांच्या मालमत्तेच्या वादावरून ५ जणांना बलात्काराच्या खोट्या आरोपात अडकवण्यासाठी ही संपूर्ण कहाणी रचली होती. पोलिसांनी आझाद, गौरव आणि अफझल यांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी खोटी तक्रार करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !