सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) येथे ६० वर्षीय वली महंमदने केला ११ वर्षीय हिंदु मुलीवर बलात्कार

आरोपी ६० वर्षीय वली महंमद

सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) – सिद्धार्थनगर जिल्ह्यात ६० वर्षांच्या वली महंमद याने ११ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.

पीडित मुलगी स्थानिक शाळेत शिकते. २० ऑक्टोबर या दिवशी ती सकाळी साधारण ११ वाजता लघवीसाठी शाळेजवळच गेली होती. या वेळी प्रतापपूर मठिया या गावातील ६० वर्षीय वली महंमद याने मुलीला फूस लावून तिला जवळच्या शेडमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. सिद्धार्थनगरमधील भाजपचे माजी आमदार सतीश द्विवेदी यांनी पोलिसांकडे आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांध मुसलमानांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षाच व्हायला हवी !