झारखंडमध्ये सॉफ्टवेयर इंजिनीयर तरुणीवर १० जणांनकडून सामूहिक बलात्कार

प्रतिकात्मक छायाचित्र

चाईबासा (झारखंड) – येथे एका २६ वर्षांच्या सॉफ्टवेयर इंजिनीयर तरुणीवर १० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. ही तरुणी एका प्रसिद्ध आस्थापनात काम करते. पोलिसांनी १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. यासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ही तरुणी तिच्या मित्रसह एका रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत असतांना १० जण तेथे आले आणि त्यांना मारहाण केली. नंतर या तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

संपादकीय भूमिका

  • अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !