‘समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्थे’च्या श्रीमती स्वाती मोहोळ यांच्या हस्ते पुणे येथे उद्घाटन !

३०० ते ४०० धर्मनिष्ठ हिंदूंची कार्यक्रमाला उपस्थिती !

सत्कार स्वीकारतांना श्रीमती स्वाती मोहोळ / शाखेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ (उजवीकडे)

पुणे – समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी येथील लोहियानगर भागात संघटनेच्या शाखेचे उद्घाटन श्रीमती स्वाती मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. याची संकल्पना ही समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्थेचे श्री. रवींद्र पडवळ यांची असून श्री. सनी गायकवाड यांना समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्थेच्या लोहियानगर शाखेचे शाखाप्रमुख पद देण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी ३०० ते ४०० धर्मनिष्ठ हिंदूंची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली, तसेच ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्राने कार्याला अधिष्ठान मिळवून दिले.

या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ कार्य करणार्‍या हिंदूंची फळी उभारण्यासाठी जोमाने प्रारंभ केला आहे, ज्यामुळे देव, देश आणि धर्म यांचे कार्य अधिक जोमाने होईल, असा विश्वास आहे. संस्थेचे कार्य असेच उत्तरोत्तर वाढून देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी तत्पर रहावे, याकरता समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था कायम प्रयत्नशील रहाणार आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.