पू. रेखाताई, तुम्ही आहात आमच्या ‘आध्यात्मिक आई’ ।

रामनाथी, गोवा येथील  सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. रामदास गोडसे यांनी सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर यांना कवितेतून केलेली प्रार्थना पुढे दिली आहे. 

परात्पर गुरुदेवा, तुमच्याविना आता या जगता नाही वाली ।

सांग ना देवा, पुन्हा पुन्हा हेच स्वर बोलते मुरली ।परात्पर गुरुदेवा, तुमच्याविना आता या जगता नाही वाली.

या भवसागरात तरून जाण्या दे आम्हा शक्ती ।

या भवसागरात तरून जाण्या आई तू दे आम्हा शक्ती । हिंदु राष्ट्र स्थापण्या कार्यप्रवण होण्यासाठी वाढव भक्ती । हीच आर्त प्रार्थना आम्ही सारे जीव करतो आई तुझ्या वाढदिनी.

हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले बोल अबोल कृतज्ञतेचे ।

कृतज्ञतेचा भाव निराळा शब्द अपुरा इथेची पडला सांग गुरुराया काय करू आता सर्वस्व अर्पण केले तुजला हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले बोल अबोल कृतज्ञतेचे.

‘सनातन प्रभात’ला अधिष्ठान आहे नित्य भगवंताचे ।

भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात । एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात.