पू. भाऊ (पू. सदाशिव परब) करती वात्सल्याची उधळण ।

पू. सदाशिव परब

सनातनचे २६ वे समष्टी संत पू. सदाशिव (भाऊकाका) परब यांच्या वाढदिवसानिमित्त डिचोली गोवा येथील कु. साधना पांडुरंग आरोंदेकर यांनी पू. सदाशिव (पू. भाऊकाका) परब यांच्याविषयी लिहिलेली कविता पुढे दिली आहे.

श्रीवल्लभ गुरुदेव दत्त । चरणी लागलेसे चित्त ।
होई जन्म, लाभे नरदेह । गुरुमाय ती संपवी मोह ।। १ ।।

तया आनंदाच्या वृत्ती । राहो नित्य मम चित्ती ।
उरे काय आता भीती । मम गुरूंची असता प्रीती ।। २ ।।

कु. साधना आरोंदेकर

निर्मळ वात्सल्यभाव । मृदू हास्याची किनार ।
समष्टीस समर्पित व्हावे । गुर्वाज्ञेने होई उद्धार ।। ३ ।।

कडू-गोड अनुभवांसी । एक साक्षीभावाची दृष्टी ।
लागली आस मनासी । नित्य गुरुकृपेची होई वृष्टी ।। ४ ।।

ऐसा उच्चार गुरुनामाचा । येतसे फळाला ।
फेर्‍यांतून मुक्तता (टीप १) होता । गुरुकृपेचा प्रसाद मिळाला ।। ५ ।।

पू. भाऊकाकांचे नाव । झणी गुरुचरणी ठळक ।
मनी प्रेमरसाचा गाव । ते गुरुप्रेमाचे उत्सर्जक ।। ६ ।।

ऐसे गुरुप्रिय सदाशिव । जीव-शिवाची सांगड ।
श्री चरणांचीच आवड । पारडे संतसेवेचे जड ।। ७ ।।

पू. भाऊ समष्टीशी एकरूप । करती वात्सल्याची उधळण ।
जयांचे वाटे अप्रूप । तयांना वाढदिनी कृतज्ञतापूर्वक नमन ।। ८ ।।

टीप १ : जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तता

– कु. साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली, गोवा. (३०.११.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक