ऑस्ट्रेलिया पोलिसांकडूनही आता खलिस्तान्यांच्या विरोधात कारवाईस प्रारंभ !
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये खलिस्तानी सार्वमताच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी आता व्हिक्टोरिया पोलिसांनी कारवाई करण्यास आरंभ केला आहे.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये खलिस्तानी सार्वमताच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी आता व्हिक्टोरिया पोलिसांनी कारवाई करण्यास आरंभ केला आहे.
भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.
पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय अमृतपाल याचा हत्यार म्हणून वापर करत आहे; मात्र ती कायमस्वरूपी त्याचा वापर करणार नाही.
भाजप २० मार्चपासून ‘सुफी संवाद’ अभियानाला प्रारंभ करणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात झालेल्या भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एप्रिलमध्ये सुफींचे संमेलनही होणार आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध रोखवण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांत विश्वासार्ह नेते आहेत अन् ते जगभरात शांतात प्रस्थापित करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
सध्या अमेरिकन कोट्यधीश ‘जॉर्ज सोरोस’ हे वादात सापडले आहेत. सोरोस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक असून मोदींवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी संसदेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर सडकून टीका केली. या वेळी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू यांचाही उल्लेख केला.
जनतेने काँग्रेसलाच संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल !
देशात राहून देशाच्या विरोधात बोलणार्या लोकप्रतिनिधींना राष्ट्रप्रेमींनी मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्यावी !
गोव्यातील वनक्षेत्राला लागलेली आग विझवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे सर्वतोपरी सहकार्य लाभणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने कळवले आहे. केंद्र सरकार देत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती गोमंतकीय कृतज्ञ आहेत.