‘एच्३एन्२ इन्फ्लूएंझा’मुळे २ जणांचा मृत्यू

नवी देहली – देशात ‘एच्३एन्२ इन्फ्लूएंझा’ या तापामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत या तापाचे ९० रुग्ण आढळून आले आहेत. हरियाणा आणि कर्नाटक येथे हे मृत्यू झाले आहेत.

गेल्या २ मासांंपासून देहलीसह भारतातील अनेक भागात इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये कोरोना सारखीच लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. या संदर्भात देहलीतील ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आवाहन केले आहे की, हा ताप कोरोनासारखा पसरतो. हे टाळण्यासाठी मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा आणि हात वारंवार धुवा.