पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या खासदारांमध्ये शिवीगाळ अन् धारिका फेकण्याची घटना

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षारक्षकांना सभागृहात बोलवावे लागले. त्यांनाही या खासदारांना आवर घालता आला नाही.

भारताला कोरोना काळात साहाय्य करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी संस्थांकडून कोट्यवधी रुपये गोळा !

गोळा केलेले पैसे भारताच्या विरोधात आतंकवादी कारवायांसाठी खर्च होण्याची शक्यता !

मुसलमान लोक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करतात ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत.

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

काँग्रेसेचे नेते दिग्विजय सिंह यांनी पाकच्या पत्रकाराला कलम ३७० रहित करण्याचे आश्‍वासन दिल्याचे प्रकरण
दिग्विजय सिंह यांना त्यांच्या काश्मिरी हिंदू असलेल्या भावजयेकडून घरचा अहेर !

अलगीकरणाचे नियम न पाळल्याने पाकने भेट म्हणून पाठवलेले आंबे स्वीकारण्यास अनेक देशांचा नकार !

पाकची जगभरात नाचक्की ! ‘पाकची आतंकवादी वृत्ती पहाता तो आंब्यांच्या नावाखाली बॉम्ब पाठवण्याच्या भीतीमुळे तर या देशांनी पाकचे आंबे स्वीकारण्यास नकार दिला नाही ना ?’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ?

(म्हणे) ‘भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर कलम ३७० वर पुनर्विचार करू !’

काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्‍वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !

चीन आणि पाक यांच्याकडून लडाख सीमेजवळ लढाऊ विमानांकडून बॉम्बफेकीचा सराव

चीनने लडाख सीमेवरील त्याच्या तिबेटमधील भागामध्ये लढाऊ विमानांद्वारे युद्धसराव चालू केला आहे. या सरावामध्ये पाकच्या वायूदलाचाही सहभाग आहे. चीनकडून थेट बॉम्बफेक करण्याचाही सराव करण्यात येत आहे. भारताचे सुखोई लढाऊ विमान कसे पाडता येईल, याचा विशेष सराव करण्यात येत आहे.

भारतातील आतंकवादाचे प्रकार आणि त्यांवरील उपाययोजना !

भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !…

कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संमती देणार्‍या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेची मान्यता

आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा
पाकने कुलभूषण जाधव यांना वर्ष २०१६ मध्ये केली होती अन्याय्य अटक !

पाकिस्तानी सैन्य ‘हमास’च्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतेे ! – पाकच्या ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

पाक सैन्य फार पूर्वीपासून हमासच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी ‘स्पेशल कमांडो यूनिट’ची एक तुकडी काही वर्षांपासून येथे नियुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.