|
नवी देहली – पाकिस्तानमध्ये बनवण्यात आलेल्या ‘सेवक-द कन्फेशन’ या ‘वेब सिरिज’द्वारे भारत आणि हिंदू यांची प्रतिमा मलिन करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांद्वारे या ‘वेब सिरिज’ला विरोध केला जात आहे. अंजूम शहजाद यांनी ही मालिका दिग्दर्शित केली आहे.
पाकिस्तान की एक वेब सीरीज का इंटरनेट पर काफी विरोध हो रहा है. https://t.co/q2theuQne8
— Zee Salaam (@zeesalaamtweet) December 10, 2022
ही वेबसिरिज २६ नोव्हेंबर या दिवशी पाकमध्ये प्रदर्शित करण्यात आली. ही मालिका ‘यू ट्यूब’वरही उपलब्ध आहे. या मालिकेत भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेली शीखविरोधी दंगल, वर्ष २००२ मधील गुजरात दंगली, तसेच बाबरी ढाचा पाडणे, या घटनांचे चित्रीकरण आहे. यात हिंदूंच्या संतांना गुन्हेगाराच्या रूपात दाखवण्यात आले आहे, तसेच महाराष्ट्र आतंकवाविरोधी पथकाचे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे, गौरी लंकेश, खलिस्तानवादी दीप सिद्धू आदींनाही यात दाखवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकापाकने भारताची प्रतिमा कितीही मलिन करण्याचा प्रयत्न केला, तरी पाकची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने याचा भारतावर काही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे ! |