इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या लाहोर शहरात २३ जून २०२१ या दिवशी जिहादी आतंकवादी हाफिज सईद याच्या घराबाहेर स्फोट झाला होता. यात ३ जण ठार, तर एका पोलीस हवालदारासह २४ जण घायाळ झाले होते. हा स्फोट घडवून आणण्यामागे भारतातील कुख्यात गुंड बबलू श्रीवास्तव याचा हात होता, असा आरोप पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी केला आहे.
Pakistan accuses India of being behind 2021 bombing outside militant home https://t.co/hj05GMCs7p pic.twitter.com/stISE6uAsa
— Reuters Asia (@ReutersAsia) December 13, 2022
बबलू श्रीवास्तव सध्या उत्तरप्रदेशातील बरेली येथील कारावासात आहे. बबलू भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हस्तक असल्याचा दावाही सनाउल्लाह यांनी केला आहे. तसेच संजयकुमार तिवारी याचाही यात हात असल्याचा आरोप पाकने केला आहे. तिवारी हाही ‘रॉ’चा हस्तक असल्याचे म्हटले आहे. तो पाकमधील समी-उल-हक आणि नावेद अख्तर यांना आदेश देत होता. संजय याचे पाकमधील अस्लम खान नावाच्या ‘रॉ’च्या हस्तकाशी संबंध आहेत.