उदयपूर (राजस्थान) येथील दुकानातून विकली जाणारी गोमांस असलेली पाकिस्तानी टॉफी जप्त !

उदयपूर (राजस्थान) – येथील एका दुकानामध्ये गोमांसाद्वारे बनवलेली टॉफी विकली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने या दुकानांतून सर्व टॉफी जप्त केल्या. या टॉफी पाकिस्तानमधून मागवण्यात आल्याचे समोर आले आहे. या टॉफीवर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिण्यात आले आहे. यावर उर्दू भाषेमध्ये बलुचिस्तानचा पत्ता देण्यात आला आहे. ही टॉफी मांसाहारी असल्याचे सांगण्यासाठी लाल ठिपकाही आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.

दुकानदाराने सांगितले की, तो या टॉफी मुंबईतून मागवत असतो. याच दुकानांतून अन्य दुकादारांना याचे वितरण केले जाते. ‘चिली-मिली’ नावाने ही विकली जाते. एक पाकीट २० रुपयांना मिळते.