नवी देहली – गुजरात पोलिसांनी सूरत येथून पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी हेरगिरी करणार्या दीपक किशोरभाई साळुंखे या ३३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. भारतीय सैन्याच्या पुण्यातील दक्षिण कमांडकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.
Surat man caught working as spy for Pakistan's ISI https://t.co/bZsWuIxwyv
— The Times Of India (@timesofindia) December 14, 2022
दीपक सूरत येथील भुवनेश्वरी भागात रहातो आणि त्याचे कपड्यांचे दुकान आहे. तो पाकमधील त्याचे प्रमुख हामीद आणि काशिफ यांच्या संपर्कात होता. तो त्यांना गोपनीय माहिती पुरवत होता.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी ! |