दिवाळखोरीकडे वाटचाल करणारा पाकिस्तान अमेरिकेतील दूतावासाची जुनी इमारत विकणार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. यामुळेत त्याला आता विदेशातील त्याची मालमत्ता विकावी लागत आहे. वॉशिंग्टनमधील पाकिस्तानच्या दूतावासाने गेल्या १५ वर्षांपासून रिकामी असलेली त्याची जुनी इमारत विकण्यासाठी परराष्ट्र कार्यालयाकडून संमती घेतली आहे. या इमारतीचे मूल्य अनुमाने १३ कोटी पाकिस्तानी रुपये एवढी आहे. पाकिस्तानी सामाजिक माध्यमांवर दावा केला जात आहे की, या येथील कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी पाकिस्तानकडे पैसेच शेष नसल्याने पाकिस्तान सरकार ही इमारत विकत आहे.

संपादकीय भूमिका

लवकरच पाकिस्तानही विकण्यास काढण्यासारखी स्थिती येणार आहे आणि तेथील जिहादी मानसिकतेमुळे तो विकत घेण्यासाठी कुणी पुढे येणार नाही !