पाकिस्तानी प्रेयसीवर प्रेम करणार्‍या भारतियाने विवाहित पत्नीला पाठवली घटस्फोटाची नोटीस !

मालाड (मुंबई) येथील घटना !

मुंबई – हिरा मलिक नावाच्या पाकिस्तानी प्रेयसीच्या प्रेमात वेड्या झालेल्या अनिवासी भारतियाने विवाहाच्या १५ वर्षांनंतर पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. पीडित मुलीचे वडील सुखलाल जैन यांनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे मागणी केली आहे.

 (सौजन्य : metro india news)

१. मालाड येथील रहिवासी सुखलाल जैन यांनी त्यांची मुलगी श्वेता जैन हिचा विवाह २० फेब्रुवारी २००८ या दिवशी राजकुमार जैन यांच्याशी लावून दिला.

२. राजकुमार यांचे कुटुंब नाहूर (पूर्व) येथे रहाते. राजकुमार जैन यांचे लंडन येथे आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. विवाहानंतर पत्नी श्वेतासमवेत ते तेथे रहात होते. पत्नी सौंदर्याेपचारतज्ञ आहे. ती लंडनमध्ये काम करते.

३. गेल्या ३ वर्षांपासून हिरा मलिक नावाच्या पाकिस्तानी मैत्रिणीच्या प्रेमाच्या जाळ्यात राजकुमार अडकले. श्वेता हिने पतीच्या अवैध संबंधांना विरोध केल्यावर राजकुमार यांनी तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली. पतीच्या छळाला कंटाळून श्वेता माहेरी परतली आहे. या प्रकरणी मालाड पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

नैतिकता संपत चालल्याचे लक्षण !