गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने आजही येलो अलर्टची, तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची चेतावणी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला आज ‘रेड’, तर पुढील ३ दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ची चेतावणी

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ वर्तवण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गोव्यात अतीवृष्टीमुळे आज शैक्षणिक सुट्टी

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पाणी साचणे, रस्त्याच्या बाजूची माती खचणे, पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात जाणे, झाडांची पडझड होणे, घरांच्या भिंती पडणे आदी घटना घडल्या आहेत. सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत !

मानवाने भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा केल्याने पालटत आहे पृथ्वीचा अक्ष (अ‍ॅक्सिस) ! – संशोधन

‘निसर्ग हा मानवासाठी असून तो ओरबाडण्याचा मानवाला अधिकार आहे’, या पाश्‍चिमात्य संकल्पनेमुळेच असे विनाशकारी पालट होत आहेत, यात काय आश्‍चर्य !

मेक्सिको देशात तीव्र उष्णतेमुळे १०० जण मृत्यूमुखी

अतिसारामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील काही ठिकाणांचे तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या पुढे गेले आहे.

येत्या पंधरवड्यात देशातील १६ राज्यांत पाऊस पडणार ! – हवामान खाते

बिपरजॉयमुळे गेल्या ४ दिवसांत गुजरात आणि राजस्थान येथे इतका पाऊस पाडला आहे की, त्यामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली आहे.

दक्षिण पूर्व आशियात भूकंपाचे धक्के !

‘सी.जी.टी.एन्.’ या चिनी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांजवळ असलेल्या समुद्रात २४ किमी खोल होते.

गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले !

या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते.

पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन !

बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती रहाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

गोव्यात पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल

गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला न घाबरण्याचे, होड्यांमधून किनारी भागात न जाण्याचे अन् सर्व सागरी क्रीडा बंद करण्याचे, तसेच ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.