गुजरातला धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले !

जामनगर (गुजरात) – बिपरजॉय चक्रीवादळ १५ जूनच्या रात्री गुजरातच्या जखाऊ  किनारपट्टीवर धडकल्यामुळे २ जणांचा मृत्यू झाला, तर २२ हून अधिक जण घायाळ झाले. त्याव्यतिरिक्त प्राण्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

या चक्रीवादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या ८ जिल्ह्यांना बसला. चक्रीवादळाच्या वेळी येथे मुसळधार पाऊस पडला. प्रतिघंटा १२० कि.मी. वेगाने वारे पहात होते. आता हे वादळ राजस्थानच्या दिशेने सरकले असून त्याचा वेग मंदावला आहे.