बिहारमधील शाळांमध्ये रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांच्या सुट्ट्या रहित !

बिहार सरकारने अन्य धर्मियांच्या सुट्ट्या का रहित केल्या नाहीत ? यातून बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार मुसलमान अन् ख्रिस्ती यांना दुखावण्याचे टाळून हिंदूंवर अन्याय करत आहे, हे लक्षात येते !

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक टीका करू नका ! – सर्वोच्च न्यायालय

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.

वर्ष २००८ मधील बेंगळुरूतील साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी महंमद अरशद खान याला अटक

वर्ष २००८ मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली. आतंकवादी गटाचा पसार म्होरक्या महंमद जुनैद याचा साथीदार महंमद अरशद खान याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणासमवेत जाणार्‍या मुसलमान तरुणीला मुसलमानांकडून मारहाण !

याविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि व्यक्तीस्वातंत्र्यवाले तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

चंद्रावर सापडला प्राणवायू !

भारताच्या ‘चंद्रयान-३’ ला मोठे यश मिळाले आहे. चंद्रावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हर या रोबोटने चंद्रावर प्राणवायू (ऑक्सिजन) असल्याचे शोधले आहे. यासह या रोव्हरला त्याला चंद्रावर ८ खनिजेही सापडली आहे.

सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

देहलीत ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या !

भारताच्या राजधानीत इतक्या सहजपणे कुणीही कुणाची हत्या करू शकतो, हे पोलिसांना लज्जास्पद !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍यांवर कारवाई करणार ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, हस्तकला महामंडळ

प्रतिवर्षी अशी चेतावणी दिली जाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळही काही मूर्तीशाळांवर धाड घालून श्री गणेशमूर्ती मातीचीच आहे ना, याची पडताळणी करते; पण मूर्ती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्यात मूर्ती तरंगतांना दिसतात.

गोव्यातील आमदार आता लेह-लडाखच्या अभ्यास दौर्‍यावर जाणार

आमदार अभ्यास दौर्‍यात काय शिकले ? त्याचा राज्यासाठी काय लाभ झाला ? किंवा होणार, ते जनतेला सांगावे, अन्यथा ‘असे अभ्यास दौरे हा केवळ जनतेच्या पैशातून मौजमजा करण्याचा एक प्रकार आहे’, असे जनतेला वाटल्यास त्यात चुकीचे काय !