चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात अटकेतील गुंडाने केलेल्या गोळीबारात २ गुंड ठार !

उत्तरप्रदेशात बाहेरील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत, त्यात आता कारागृहातही तीच स्थिती पोलिसांना लज्जास्पदच  होय !

कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणार्‍या मुलीकडे त्याच्या मोबदल्यात शारीरिक संबंधाची मागणी

अशी वासनांधांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! अशा वेळी पोलीस स्वतःहून गुन्हा नोंदवून आरोपीला अटक का करत नाहीत ? कि त्यांना याचेही काहीच वाटत नाही ?

स्वतःच्या भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यामुळे मंत्र्यांना धमकी देणार्‍या सैनिकाविरुद्ध गुन्हा नोंद

उद्या अशा स्थितीमुळे देशात अराजक माजल्यास आश्‍चर्य वाटू नये !

सर्वांनी यज्ञ करून आहुती दिल्यास कोरोनाची तिसरी लाट देशाला स्पर्शही करू शकणार नाही ! – मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर

यज्ञ-यागत सामर्थ्य आहे आणि ते करणे केव्हाही चांगलेच; मात्र त्यासह प्रत्येक भारतियाने कठोर साधना करून ईश्‍वराला आळवले, तर कोरोनाचे नव्हे, तर कुठल्याही संकटातून ईश्‍वर देशाला तारणार, हे निश्‍चित !

कटिहार (बिहार) येथे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांकडूनच कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस

उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गेल्या काही दिवसांपासून सतत अशा घटना घडत असल्याचे समोर येत असतांना प्रशासन त्या रोखण्याविषयी निष्क्रीय का आहे ? कि याविषयी आता न्यायालयाने आदेश दिला पाहिजे, असे त्यांना वाटते ?

धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

व्याख्यानात सहभागी झालेल्या युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची सामाजिक प्रसारमाध्यमांवर अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोहसीन शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या भागावर श्री महाकाली देवीचे चित्र

हिंदूंकडूनच हिंदूंच्या देवतांचा अवमान होणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! केंद्र सरकारने अशा प्रकारचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात ईशनिंदा करणारा कायदा बनवणे आवश्यक आहे !

‘रेमडेसिविर’ रुग्णांसाठी महत्त्वाचे असतांना त्याचा पुरेसा पुरवठा ठेवण्याची दक्षता का घेतली नाही ?

मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २ मास्क वापरण्याविषयी केंद्र सरकारकडून दिशानिर्देश

‘जामा इंटर्नल मेडिसीन’  या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की २ मास्क वापरण्याचे कारण म्हणजे कपड्यांचे थर घालणे इतकेच नव्हे, तर मास्कमधील कोणतेही अंतर किंवा खराब फिटिंग्ज दूर होणे, हे आहे.