कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २ मास्क वापरण्याविषयी केंद्र सरकारकडून दिशानिर्देश

नवी देहली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी लढा देतांना अनेक वैद्यकीय तज्ञांनी संसर्ग रोखण्यासाठी २ मास्क वापरण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने ‘२ मास्क वापरतांना काय करावे आणि काय करू नये ?’ हे सांगितले आहे. ‘जामा इंटर्नल मेडिसीन’  या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की २ मास्क वापरण्याचे कारण म्हणजे कपड्यांचे थर घालणे इतकेच नव्हे, तर मास्कमधील कोणतेही अंतर किंवा खराब फिटिंग्ज दूर होणे, हे आहे.

हे करा !

१. दोन मास्कमध्ये, सर्जिकल मास्क आणि दुहेरी किंवा तिहेरी स्तर असलेल्या कपड्यांचा मास्क असावा.

२. नाकावर मास्क घट्ट बसला पाहिजे.

३. श्वास रोखला जात नसल्याचे सुनिश्चित करा.

४. कापडी मास्क नियमितपणे धुवा.

हे करू नका !

१. एकाच प्रकारचे दोन मास्क वापरू नका.

२. सलग २ दिवस समान मास्क वापरू नका.

एका अभ्यासानुसार, २ घट्ट बसवलेले मास्क परिधान केल्याने ‘सार्स-कोव्ह-२’ आकाराचे कण तोंडात आणि नाकात जाण्यापासून बचाव करतात.