पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘मॉर्फ’ केलेले छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून अपकीर्ती केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव मोहसीन शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.