‘कोरोना’ म्हणजे ‘कोई रोडपर ना निकले’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी योग्य प्रबोधन करणार्‍यांचा उल्लेख केला होता. यामध्ये त्यांना आवडलेला फलक म्हणजे ‘को – कोई, रो – रोडपर, ना – ना निकले’, अशाप्रकारे कोरोनाचा अर्थ दर्शवणारा होता.

उद्दामपणा आणि समाजद्रोहही !

कोरोनाचे संकट भारतावर घोंघावत असतांना गेल्या काही दिवसांपासून शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे याविषयी जनजागृती करत आहेत. संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले.

महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी

महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले.

२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.

देशात २१ दिवस संपूर्ण ‘दळणवळण बंदी’ लागू ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी २४ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात २१ दिवसांची (१४ एप्रिलपर्यंत) ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात येत आहे.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर नमाजपठण घरी करण्याचे मशिदीतून आवाहन

येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.