पुरोगाम्यांचा दबाव आणि अन्वेषण यंत्रणांची हतबलता यांमध्ये अडकलेले दाभोलकरांच्या हत्येचे अन्वेषण !

२० ऑगस्ट २०१३, सकाळी साधारण ७.३० वाजताची वेळ ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणारे नास्तिकतावादी नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेले आणि दुसरीकडे नेहमीच वादग्रस्त राहिलेले व्यक्तीमत्त्व !

‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.

‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ पुस्‍तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा !

नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍यांनंतर हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अटकसत्र, भरकटून टाकण्‍यात आलेले अन्‍वेषण यांविषयी आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या तथ्‍यांवर सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी वस्‍तूनिष्‍ठ, निष्‍पक्षपाती आणि सडेतोड लिखाण ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ या पुस्‍तका केले आहे. 

नास्तिकतावाद्यांच्या हत्येच्या भरकटलेल्या अन्वेषणाची पोलखोल !

मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्तिकतावाद्यांच्या गोळ्या घालून हत्या झाल्या. या चारही प्रकरणांत तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता.

‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी नास्तिकतावाद्यांच्या हत्यांमागील बाहेर न आलेले सत्य उघड करणारे पुस्तक !

हे पुस्तक म्हणजे नास्तिकतावादी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांसंबंधी प्रकाशित माहिती अन् न्यायालयाचा आदेश यांविषयी एक विस्तृत संशोधन आहे. या पुस्तकातून वरील हत्यांच्या अन्वेषणातील  अनेक अज्ञात तथ्ये उघड केली आहेत.

तपासयंत्रणांनी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे ! – लेखक डॉ. अमित थडानी

शीव येथील षण्मुखानंद सभागृहात २९ एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण !

३ आठवड्यांत सीबीआय भूमिका स्पष्ट करणार

हिंदु राष्ट्राला ‘धर्मांध’ म्हणणार्‍या पुस्तकाची दाभोलकर कला प्रदर्शनस्थळी विक्री !

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न पहाणारे आणि त्यासाठी आतंकवादी कारवाया करणारे मुसलमान ‘धर्मांध’ नाहीत, तर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र ‘धर्मांध’ आहे, अशी विचारसरणी असणार्‍या पुरो (अधो)गाम्यांचा भारतद्वेषी दांभिकपणा जाणा !

(म्हणे) ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सनातन संस्थेनेच केली आहे !’

अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना किंवा पुरावाही दिलेला नसतांना शाम मानव यांचे सनातनद्वेषाचे तुणतुणे चालूच ! ‘अनेक वर्षांनंतर हिंदुद्वेषाचा आलेला कंड सनातन संस्थेचे नाव घेऊन मानव शमवू पहात आहेत का ?’

(म्हणे) ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या कट्टर संस्था समाजासाठी घातक !’

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी प्रतिज्ञापत्रात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून उल्लेख