महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त ! – राष्ट्रीय कुस्ती संघटनेचा निर्णय

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. या परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे वर्चस्व होते. नवी देहली येथील राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. ‘महाराष्ट्रातील राजकारणाचा संघटनेच्या बरखास्तीशी काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांत कुस्तीगीर संघाच्या कामाविषयी अनेक तक्रारी येत होत्या. संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना मी त्यात सुधारणा करण्यास सांगितले होते’, असे शरद पवार यांनी सांगितले.