लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांना हटवले !

भावना गवळी

मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांना हटवण्यात आले आहे. शिवसेनेचे लोकसभेचे संसदीय गटनेते खासदार संजय राऊत यांनी ६ जुलै या दिवशी लोकसभेच्या अध्यक्षांना याविषयीचे पत्र दिले आहे. भावना गवळी यांना प्रतोदपदावरून काढून त्यांच्या जागी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर खासदार भावना गवळी यांनी ‘शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचे म्हणणे समजून घ्यावे’, अशी विनंती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.