हिंदु जनजागृती समितीचे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियान !
मुंबई – मॅकडोनाल्ड्स, के.एफ्.सी., बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारखी नामवंत आस्थापने यांच्या दुकानांमध्ये (आऊटलेटमध्ये) ‘हलाल’ नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने हिंदू, जैन, शीख अशा मुसलमानेतर समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकत आहेत. भारतातील १५ टक्के मुसलमान समाजासाठी ८० टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती केली जात आहे. एकीकडे भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणायचे आणि दुसरीकडे धर्माच्या आधारावर हिंदूंना वेठीस धरण्याचा प्रकार चालू आहे. याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत ‘मॅकडोनाल्ड आऊटलेट’, ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ यांसारख्या आऊलटेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर, जळगाव, नागपूर, अमरावती, पुणे, तसेच गोव्यातील मडगाव आणि पणजी यांचा समावेश होता. कोल्हापूर येथे ‘मॅकडोनाल्ड आऊटलेट’च्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.
‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील त्यांची दुकाने १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित आहेत, असे घोषित केले आहे. ‘मॅकडोनाल्ड’मध्ये जाणार्या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार सिद्ध करण्यात आलेला ‘हलाल’चा पदार्थ देणे हा हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अनादर आहे. भारतातील हिंदूंना खाण्याचे किंवा खरेदीचे घटनात्मक स्वातंत्र्य का नाही ? कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती खपवून घेणार नाही. त्यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करावी, असे आवाहन समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले.
‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?
इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरता मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हटले जाते. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातून रचलेला हा कट आहे .