धारावीचा पुनर्विकास झाल्यासच मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल ! – एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प

‘गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत नागरिकांचे लोंढे येत आहे. प्रतिदिन साधारणतः २०० कुटुंबे मुंबईत स्थलांतरित होतात. एका घंट्याला १० ते १५ कुटुंबे मुंबईत येतात. त्यामुळे झोपडपट्टी ही मोठी समस्या ठरली आहे’, असेही श्रीनिवास म्हणाले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची एक ध्वनीचित्रफीतही प्रसारित होत असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार चालू आहेत.

१५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार

महापालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांचे पुनर्वसन करतांना मूळ भूमीइतकीच भूमी देण्याचे शासन धोरण घोषित !

शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून १४ ऑक्टोबर या दिवशी याविषयीचा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश इथे पाहू शकता . . .

दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचार्‍यांना १२ सहस्र ५०० रुपये अग्रीम !

अराजपत्रित शासकीय कर्मचार्‍यांना उत्सव अग्रीम (आगाऊ रक्कम) म्हणून बिनव्याजी १२ सहस्र ५०० रुपये देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांप्रमाणेच गट ‘क’ आणि गट ‘ब’ या अराजपत्रित संवर्गातील कर्मचार्‍यांनाही उत्सव अग्रीम मिळणार आहे.

मराठीतून निवेदन करण्यासाठी ‘स्टार स्पोर्ट्स’ला मनसेकडून चेतावणी !

महाराष्ट्रात प्रक्षेपण करून कोट्यवधी रुपये कमवायचे; मात्र मराठीला प्राधान्य देण्यासाठी चालढकल करायची, असा उद्दामपणा करणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे !

मुंबई विमानतळावर ८ कोटी ४० लाख रुपयांचे सोने जप्त !

सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणार्‍याला मुंबई विमानतळावर अटक करून त्याच्याकडून १६ किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याचे मूल्य ८ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. १३ ऑक्टोबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीपुरते वाढणार !

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीच्या सुट्ट्यांपुरते १० टक्क्यांनी वाढणार आहेत. ही हंगामी भाडेवाढ २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.

अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्‍यांना एकूण ७५५ कोटी रुपयांचे साहाय्य !

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी एकूण ७५५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ३ हेक्टरपर्यंतच्या हानीसाठी प्रत्येक हेक्टरी १३ ते ३६ सहस्र रुपये देण्यात येतील.

भायखळा (मुंबई) येथे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत ‘शिवसेना शिवसेना’ हे गाणे वाजवले !

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ‘आतंकवाद्यांशी लढतांना शहीद झालेले लष्करातील औरंगजेबसारखे जवान आमचे बंधू आहेत’, असे म्हटले होते. या दसरा मेळाव्याला अनेक मुसलमान शिवसैनिकांची उपस्थिती होती.