मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रमोद डोईफोडे, तर उपाध्‍यक्षपदी महेश पवार यांची निवड !

मुंबई, ३१ जानेवारी (वार्ता.) – मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक ३० जानेवारी या दिवशी पार पडली. या निवडणुकीत संघाच्‍या अध्‍यक्षपदी दैनिक ‘मुंबई लक्षद्वीप’चे पत्रकार श्री. प्रमोद डोईफोडे हे निवडून आले. उपाध्‍यक्षपदी ‘टीव्‍ही ९’ चे पत्रकार श्री. महेश पवार निवडून आले. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्‍हणून पत्रकार राजन पारकर यांनी काम पाहिले.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्‍या कार्यवाहपदी प्रवीण पुरो, कोषाध्‍यक्षपदी दैनिक ‘भास्‍कर’चे पत्रकार विनोद यादव हे निवडून आले. कार्यकारिणीपदी दैनिक ‘इंडियन एक्‍सप्रेस’चे पत्रकार आलोक देशपांडे, दैनिक ‘नवाकाळ’चे पत्रकार खंडूराज गायकवाड, दैनिक ‘लोकमत’चे पत्रकार मनोज मोघे, दैनिक ‘डेक्‍कन क्रॉनिकल’चे भगवान परब आणि ज्‍येष्‍ठ पत्रकार कमलाकर वाणी हे निवडून आले. प्रति २ वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते. नूतन अध्‍यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी ‘सर्वांना समवेत घेऊन काम करीन. पत्रकारसंघाचे काम उंचावण्‍याचा प्रयत्न करीन’, असे मनोगत व्‍यक्‍त केले.